चंद्रपूर-गडचिरोली महामार्ग बनलाय अपघात प्रवणक्षेत्र
गडचिरोली—चंद्रपूर राष्ट्रिय महामार्गावर सतत होत असलेल्या अपघातामुळे, हा मार्ग म्हणजे आता अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जात आहे.
गडचिरोली—मूल—चंद्रपूर या 100 कि.मी. अंतराच्या राष्ट्रिय महामार्गावर दररोज किमान एक—दोन अपघात होतच असल्यांचे दिसून येत आहे.
या रस्त्यांचे काम पूर्वीपासुनच दर्जाहीन करण्यात आल्यांचा आरोप आहे. काम केले की, दुसरे दिवशीच रस्ते उखळून जातात, तर जागोजागी खड्डे पडलेले दिसून येत आहे. हा महामार्ग गडचिरोली ते मूल पर्यंत सिमेंटचे करण्यात आले. या मार्गावरही अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत.
मूल नदीजवळील टि पाईंटजवळील चुकीच्या कामामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. अनेक ट्रक रस्त्याचे बाजुला उलटले असून, दुचाकीचेही अपघात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
मूल—चंद्रपूर दरम्यान दुपदरी डांबरीकरण असून, हा रस्ता वारंवार जागोजागी फुटत असतो तर रस्ता केल्यानंतर, एक दोन दिवसातच बर्याच ठिकाणी उखडून जातो.
या रस्त्यांचे बाजूचे सायडींग भरण्यांचे कामही मजबूत करण्यात आले नाही, यामुळे वाहन रस्त्याचे खाली आले कि, चिखलात रूतून राहत असल्यांचेही प्रकार घडत आहे.
दिनांक 20 जुलै रोजी डोंगरीजवळ, एक आंध्रप्रदेशात जाणारा ट्रक असाच फसून पलटी मारत होता, मात्र झाडामुळे, मोठा अपघात होतांना बचावले. याच दिवशी महादवाडी तलावाजवळ मूल वरून चंद्रपूरला जाणारी बसही रस्त्याचे खाली आल्यांने, तलावात पडण्यांची भिती होती, मात्र बस चालकांच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला. दोन दिवसापूर्वी याच तलावात मूल वरून ताराचे बंडल घेवून जाणारा ट्रक उलटला होता जो अजुनपर्यंत बाहेर काढता आला नाही.
हा रस्ता वारंवार खराब होत असल्यांने, जागोजागी खड्डे पडत असल्यांने, वाहनचालक खड्यापासून बचावाच्या प्रयत्नात दररोज अपघात होत आहेत.
मागील काही महिण्यांपासून, छत्तीसगड, मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. मूल तालुक्यातून रेती तस्करीचे हायवाची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्या तुलनेत, हा रस्ता चारपदरी आणि एकेरी वाहतूकीचा होणे आवश्यक असतांना, रस्त्यांची रूंदी कायम ठेवल्यांने आणि मध्ये दुभाजक नसल्यांनेही अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
चंद्रपूर मूल गडचिरोली हा नविन राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर केलेला असला तरी, महामार्गावरील कोणतीही सुविधा येथे उपलब्ध नाही, मात्र महामार्ग पोलिस मध्ये—मध्ये आपले अस्तित्व दाखवित 'वसुली' करीत असल्यांचेच दिसून येत आहे.
या राष्ट्रिय महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता, याकडे संबधीत यंत्रणेने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!