दुचाकी सायकल अपघातातील राजू पोरटे या दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुचाकी सायकल अपघातातील राजू पोरटे या दुचाकीस्वाराचा मृत्यू


मूल (प्रतिनिधी)

मूल शहरातील योग राईस मिल जवळ दोन दिवसापूर्वी झालेल्या दुचाकीस्वार आणि सायकलस्वारांच्या धडकेत गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार राजू पोरटे यांचा नागपूर येथे आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूसमयी ते केवळ 24 वर्षाचे होते. त्यांचे मृत्यूमुळे चांदापूर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसापूर्वी आपले काम आटोपून मूल वरून राजू पोरटे आपल्या चांदापूर गावाला निघाला होता. विरूध्द दिशेने येणार्या रमेश नारायण ठाकूर या सायकलस्वारास धडक दिली.  या अपघातात राजूच्या डोक्याला गंभीर मार लागल्यांने त्याला नागपूर येथे उपचाराकरीता नेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाले.

राजू पोरटे यांचे मृत्यूपश्चात त्याची आई, पत्नी, दहा महिण्यांचा छोटा बाळ, भाउ असा परिवार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!