मुल येथील प्रभाग क्रमांक 10 येथे तत्काळ रोड, नाली व स्ट्रीट लाईट ची व्यवस्था करण्यात यावी
मूल:- प्रतिनिधी
मुल येथील प्रभाग क्रमांक 10 येथील घनकचरा रोड शेजारील आदिवासी लेआऊट मध्ये रोड व नालीचे काम केलेले नाही. त्यामुळे तेथील परिसरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. तेथील नागरिकांना जनेयेने करण्या करिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच जागोजागी पाणी साचून असल्यामुळे साथीचे रोग सुद्धा पसरत आहेत. याबाबतची दाखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे व महिला शहर अध्यक्ष अर्चना चावरे यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुल येथे निवेदन देण्यात आले.
सदर बाबतीत लवकरात लवकर कार्यवाही करू असे आश्वासन नगर परिषद तर्फे देण्यात आले.
निवेदन देताना नंदू कावडे, शिला सलाम,लक्षी मडावी,साधना मेश्राम,रंजना सिडाम,छाया कटकमवार,संगीता चीत्रोजवर,बेबीताई मडावी,शिलाताई पंध्रे,सविता कावडे,पंकज कटकामवर, सुलोचना पोर्टे,प्रतीक्षा गुरूनुले,जनाबाई धकाते,पल्लवी गुंडावार , रूपा रोहनकर व इतर नागरिक उपस्थित होते.
सदर कामाची दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!