ज्या ग्रा. प.ची विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे अश्या ग्रा. प. चे विद्युत पुरवठा तात्काळ जोडण्यात यावा 'सरपंचांनी दिले जिल्हा अधिकारी यांना निवेदन.'
ज्या ग्रा. प.ची विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे अश्या ग्रा. प. चे विद्युत पुरवठा तात्काळ जोडण्यात यावा 'सरपंचांनी दिले जिल्हा अधिकारी यांना निवेदन
तळोधी बा(यश कायरकर)
सोमवारला मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर असल्यामुळे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना नागभीड तालुक्यातील सर्व सरपंचाच्या वतीने *पथदिवे विद्युत बिलाच्या रक्कमेचा भरणा आपल्या स्तरावरून करावा व विज कनेक्शन कापण्याची मोहीम तात्काळ थांबवावी व ज्या ग्रा. प.ची विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे अश्या ग्रा. प. चे विद्युत पुरवठा तात्काळ जोडण्यात यावा* अन्यथा *दिनांक 27/06/2022 रोज सोमवारला* नागभीड तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्याचे उपस्थितीत आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याबाबत निवेदन देण्यात आले. तसेच ठिय्या आंदोलनाची रितसर परवानगी घेण्यात आली. सदरचे निवेदन देताना श्री कमलाकर ठवरे सरपंच बाळापूर बु. , श्री. अमोल बावनकर सरपंच येणोली माल, श्री. देवेंद्र गेडाम सरपंच वाढोणा, श्री छगन कोलते सरपंच किटाळी बोर., श्री. रविंद्र निकुरे सरपंच सावरगाव, श्री. गणेश गड्डमवार सरपंच , सौ. निरंजना बावणे सरपंच विलम , सौ वैशाली गायधने,जनकापूर सौ.शिला ठोंबरे सरपंच सोनापूर, सौ. अनिता पेंदाम सरपंच चारगाव चक हे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!