विवेकानंद विद्यालय बेंबाळचा 100 टक्के निकाल
विवेकानंद विद्यालय बेंबाळचा 100 टक्के निकाल
मराठी माध्यमाच्या शाळेतून एकाच शाळेतील तीन विद्यार्थी मूल तालुक्यात प्रथम
मूल (प्रतिनिधी)
तालुक्यातील रामकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ बेंबाळ द्वारा संचालित विवेकानंद विद्यालय बेंबाळ ने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखीत मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी च्या परीक्षेत 100 टक्के निकाल लावून परिसरात कौतुकास पात्र ठरलेली आहे. शाळेतून एकूण 104 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यात सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्राविण्य श्रेणीत 67 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 33 व द्वितीय श्रेणीत 04 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतून या विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनि एकत्रित रित्या प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे. त्यात सिकंदर चरणदास गोल्लावार - 93.40 टक्के ,ओंकार रमेश पाल - 93.40 टक्के, व नम्रता रिगल गोहणे - 93.40 टक्के यांनी शाळेतुन व तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकावला आहे.तालुक्यातुन साक्षी राजेंद्र गोहणे या विद्यार्थिनीने 93.20% टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
अथर्व शामसुंदर कोट्टलवार हा विद्यार्थी 92.60 टक्के गुण मिळवून तालुक्यातुन तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. युगंधरा सुनील पोगुलवार हिने 92.20 टक्के गुण प्राप्त केले आहेत.
शाळेतील सर्व गुणवत्ताप्राप्त व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे पदाधिकारी सुरेश अहिरकर, एन. जे.आरेकर, तुकाराम पेटकुले, मुख्याध्यापक केवळराम कामडी, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व आईवडिलांनी केले आहे.
..
बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क
मंगला बोरकुटे
प्रतिनिधी
संपर्क: 9923451367



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!