ग्राम साहित्य पुरस्कारासाठी लक्ष्मण खोब्रागडे, सौ. प्रिती जगझाप ,सौ. भारती तितरे, संजिव बोरकर यांची निवड
ग्राम साहित्य पुरस्कारासाठी लक्ष्मण खोब्रागडे, सौ. प्रिती जगझाप ,सौ. भारती तितरे, संजिव बोरकर यांची निवड
चंद्रपूर (प्रतिनिधी) -
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती द्वारा देण्यात येणाऱ्या रा.ज. बोढेकर स्मृति ग्रामसाहित्य लेखन पुरस्कारासाठी कवी लक्ष्मण खोबरागडे मुल , कवयित्री सौ. प्रीती जगझाप बल्लारपूर ,कवी संजीव बोरकर गडचिरोली, कवयित्री सौ. भारती तितरे चामोर्शी या चार व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. चारही व्यक्तिंनी आजवर विविध ग्राम साहित्य संबंधित लेखन केले आहे.तसेच झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यात सहभाग आणि काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे
नुकत्याच झालेल्या परिषदेच्या वार्षिक सभेत हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील दरवर्षी नवोदित लेखक-कवींना सदर पुरस्कार देण्यात येत असतो. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, सन्मानपत्र, मानवस्त्र आणि ग्रामगीता आहे. सदर पुरस्काराचे वितरण शाहु महाराज जयंती दिनी येत्या २६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार संघाच्या भवनात प्रदान करण्यात येणार आहे . तसेच या ठिकाणी ज्येष्ठ लेखक यवनाश्व गेडकर यांच्या स्मृती सुगंधाची गुंफण या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या कवींचे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सरचिटणीस अँड. राजेंद्र जेनेकर, विलास उगे, देवराव कोंडेकर,संजय वैद्य, प्राचार्य भाऊ पत्रे, नामदेव गेडकर, नारायण सहारे, डॉ. बानासुरे , यवनाश्व गेडकर आदींनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!