खडसंगी - मासळ जिल्हा परिषद सिमांकन बद्दल प्रणय कारेकार यांचे जिल्हाधिकारी अजयजी गुल्हाने यांना निवेदन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणांची निर्मिती व सिमाकंन जाहीर करण्यात आले . त्याप्रमाणे खडसंगी - मुरपार जिल्हा परिषद क्षेत्र बदलून त्याला खडसंगी - मासळ जिल्हा परिषद क्षेत्र करण्यात येऊन तशी घोषणा करण्यात आली सिमांकन जाहीर करण्यात आले. खडसंगी - मासळ जिल्हा परिषद क्षेत्र दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे नाही.नवनिर्मित क्षेत्राचे अंतर जास्त असल्याने विकासाच्या दृष्टीने अयोग्य आहे. खडसंगी आणि मासळ या क्षेत्राच्या मध्यभागी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्याने खडसंगी जंगलाच्या या भागाला आणि मासळ दुसऱ्या भागाला आहे .नविन सिमांकनावर जनतेचा आक्षेप आहेत. संबंधित विषयांवर चर्चा करून खडसंगी - मुरपार जिल्हा परिषद क्षेत्रचं पुनश्च करण्यात यावे ही मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!