घवघवित यश प्राप्त करणार्या खुशिचा तहसिलदारांनि केला सत्कार

घवघवित यश प्राप्त करणार्या खुशिचा तहसिलदारांनि केला सत्कार

जिल्हात प्रथम क्रमांक पटकविण्याचा मान
भारत विघ्यालय नवरगावची जिल्हात प्रथम क्रमांक देण्याची परंपरा कायम
खुशिचे सर्वच स्थरातून कौतूक
भारत विघ्यालय नवरगावची सन १९७२  पासूनची परंपरा कायम



सिंदेवाही(प्रतिनिधी) 
नुकताच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात नवरगाव येथील भारत विद्यालय येथील विद्यार्थिनी खुशी पडोळे हीने जिल्हातुन प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सिन्देवाही तहसिलचे तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, नुकताच  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या जाहीर झालेल्या निकालामध्ये सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील भारत विद्यालय येथील खुशी पडोळे या विद्यार्थिनीने ९८.२०%गुन मिळवून चंद्रपुर जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक मिळवीला. आज दिनांक २१ जून रोजी तहसील कार्यालय सिंदेवाही येथे खुशी चा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये गणेश जगदाळे (तहसीलदार सिंदेवाही), अक्षय सुकरे (गट विकास अधिकारी सिंदेवाही), योगेश घारे (पोलीस निरीक्षक सिंदेवाही), पालवे (गट शिक्षण अधिकारी सिंदेवाही), धात्रक (नायब तहसीलदार), गोपाल थेरकर (मुख्यध्यापक भारत विद्यालय नवरगाव), अरुण सोनवणे (शिक्षक भारत विद्यालय नवरगाव)खुशिचे आई वळील तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात खुशी पडोळे हिचा सत्कार तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते  करण्यात आले. व त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. विध्यार्थ्यांनि मनापासुन परिश्रम केल्यास त्यांना निश्चितच यश मिळते असे मत तहसिलदार गणेश जगदाळे यांनि व्यक्त केले तर खुशी पडोळे हिने आपल्या मनोगतात दहावीत उत्तीर्ण होण्याचे श्रेय आपले आई-वडील, वर्ग शिक्षक विघ्यालयाचे मुख्याध्यापक, यांना दिले व मला स्पर्धा परिक्षेचि तयारि करायचि आहे असे सांगितले.शाळेचे मुख्याध्यापक थेरकर यांनि आपल्या मनोगतात शाळेचि शिस्त,शाळेकडून घेण्यात येनार्या स्पर्धा,विध्यार्थांकडून परिक्षेचि करून घेण्यात येणारी तयारी,चाचण्या व शाळेच्या अध्यक्षासह संचालक मडळं यांचे विघ्यालयावर असनारे लक्ष या मुळेच विघ्यालय दरवर्षि गुनवंत विघ्यार्थि घडवित आहे.भारत विघ्यालय नवरगावची परंपरा सन १९७२ पासुन सुरू असून ति पुढे सुध्दा अविरत सुरूच राहणार असल्याचे  मनोगत व्यक्त केले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार आशीष गुरनुले यांनी केले. 

बोर्डाच्या यादीत नाव असणारे भारत विद्यालय नवरगाव चे विद्यार्थी-
१९७२ डॉ. आनंदे १८ वा क्रमांक
१९८१ सुनीता देशपांडे २१ वा क्रमांक
१९९८ अनंत भेंडे १७ वा क्रमांक
२००६ प्रियंका चिलबुले ३ रा क्रमांक

 जिल्ह्यातुन १ क्रमांक प्राप्त करणारे भारत विद्यालय नवरगाव चे विद्यार्थी

२०१३ समृद्धी सिद्धमशेट्टीवार १ ला क्रमांक
२०१७ रंजन बोरकर १ ला क्रमांक 
२०१९ मृणाली गहाने १ ला क्रमांक
२०२२ खुशी पडोळे १ ला क्रमांक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!