आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


सिन्देवाही(प्रतिनिधी) 

सर्वोदय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व सर्वोदय कन्या विद्यालय तथा कन्या कनिष्ठ महाविद्यालय तसेच तालुका विधी   सेवा समिती, सिंदेवाही च्या वतीने  आज दिनांक 21 जून 2022 रोज  मंगळवरला ठीक 7.30 वाजता सर्वोदय विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले.

   या कार्यक्रमासाठी भोसले , दिवाणी न्यायाधीश,प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी,न्यायालय सिंदेवाही तसेच माननीय अरविंदजी जैस्वाल,सचिव विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही तसेच माननीय भांडेकर वकील ,  माननीय दलाल वकील ,माननीय निकुरे ,प्राचार्य श्री. केकरे , प्राचार्या यादव मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
     यावेळी विनय खोब्रागडे ,सुनील सुकारे .कृष्णा ठीकरे ,दिनेश रहाटे यांच्या मार्गदर्शनात  सर्वोदय विद्यालय ,सर्वोदय कन्या विद्यालय व तालुका विधी सेवा समितीच्या सर्व कर्मचारी वर्गाने योगासने केली.
   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!