21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा

बल्लारपूर :-(धनंजय पांढरे )

तालुका क्रीडा संकुल,विसापूर बल्लारपूर तथा तालुका क्रीडा कार्यालय,बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.चंदनसिंह चंदेल (माजी अध्यक्ष, वनविकास मंडळ,म.रा.) उपस्थित होते.तसेच मा.तहसीलदार श्री संजय राईंचवार, मा. पोलीस ठाणेदार श्री उमेश पाटील,मा.गटविकास अधिकारी श्री किरणकुमार धनवडे,माजी शिक्षण सभापती मा.सौ जयश्री मोहूर्ले, योग शिक्षक मा.ऋषीपाल गेहलोत प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रजवलन करून भारत माता च्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाला. मान्यवरांचे स्वागत सामाजिक अध्यात्मिक क्रीडा अशा विविध मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना तहसीलदार श्री संजय राईंचवार, यांनी केले.तर संचालन श्री उमेश कडू सर यांनी केले.सदर कार्यक्रम आयोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी क्रीडा अधिकारी श्री राजू वडते सर व तालुका क्रीडा संयोजक श्री किशोर मोहूर्ले यांनी यशस्वीपणे पार पाडली. या कार्यक्रमाकरिता बल्लारपूर तालुका योगा असोसिएशन, रणरागिनी हिरकणी फाउंडेशन हिरकणी ढोल पथक रोटरी क्लब बल्लारपूर इंदिरा क्रीडा मंडळ तरुण उत्साही बहुउद्देशीय व क्रीडा मंडळ, श्रीवाणी नॅचरोपॅथी सेंटर, श्री राम बालक आखाडा, पाखडी हनुमान व्यायाम शाळा,योग मृत्य परिवार, गोकुळ सोसायटी क्रीडा मंडळ, उमंग महिला योग ग्रुप,शौर्य बहुउद्देशीय मंडळ, संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय बल्लारपूर ,गुरुदेव सेवा मंडळ बल्लारपुर,महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक महासंघ बल्लारपूर,वार्ड माझा प्रयत्न माझा मित्र मंडळ, मार्गदर्शन अकॅडमी (पोलीस भरती व आर्मी भरती) सहयोग व मेहनत घेतली.आभार प्रदर्शन श्री किशोर मोहूर्ले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!