मैजिक बस इंडिया फाउंडेशन तर्फे स्कुल चले हम अभियान मोहीम सुरू
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक २८ जून २०२२ रोज मंगळवार ला जिल्हा पूर्व माध्यमिक शाळा सेंद्री बूज,येथे मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या स्केल प्रकल्पाअंतर्गत स्कूल चले हम अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त संख्यने विध्यार्थी पटसंख्या हजर रहावी त्याच बरोबर शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि बालकांच्या अधिकारा विषयी जनजागृति करण्याकरिता गावामधुन रैली काढण्यात आली व या रॅली दरम्यान चौका चौकात घोषवाक्याच्या माध्यमातून शिक्षणाविषयी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन अनिल जांभुरे (समुदाय समन्वयक) व भूषण कोकूड़े (शाळा सहाय्यक अधिकारी ) यांनी केले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपत जी मरघडे ग्रामपंचायत सरपंच व प्रमुख अतिथि मनुन लाभलेले मुख्यध्यापक पारधी सेंद्रि बूज,सर्व अंगनवाड़ी सेविका व मदतनीस आनी आशा वर्कर वैशाली गरपड़े हे या कार्यक्रमात उपस्थित होते.
आणि हाच कार्यक्रम पवनी तालुक्यातील ४४ गावांमध्ये पवनी तालुक्याचे तालुका व्यवस्थापक विनोद जी शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम राबविण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!