ग्रामपंचायत नवेगाव पांडव व जिल्हा परिषद शाळा नवेगाव पांडव यांना आय एस ओ नामांकन
तळोधी बा(यश कायरकर)
नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायत नवेगाव पांडव या गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
त्या मागचे कारण म्हणजे नवेगाव पांडव येथील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत नवेगाव पांडव या दोघांना आय एस ओ बनवण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत नवेगाव पांडव व जिल्हा परिषद शाळा नवेगाव पांडव यांना नुकतेच आय एस ओ प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी राजस्व ब्रम्हपुरी मा.श्री.संदीप भस्के साहेब व गट विकास अधिकारी पं स. नागभिड कु. प्रणाली खोचरे मॅडम यांच्या हस्ते बहाल करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम ग्रामपंचायत नवेगाव पांडव च्या परिसरात घेण्यात आला.
या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन नागभिड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कु प्रणाली खेचरे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून उप विभागीय अधिकारी श्री. संदीप भस्के साहेब उपस्थीत होते. डायरेक्टर कोल्हे सर यांनी आय एस ओ चे पुर्णपणे विश्लेषण करून सांगितले व योग्य ते मार्गदर्शन केले .
उपविभागीय अधिकारी श्री भस्के साहेबांनी मार्गदर्शन करताना गाव असंच स्वच्छ असायला पाहिजे . गावाला सगळ्या भौतिक सुविधा असल्या पाहिजेत. गावाच्या विकासासाठी नेहमी कार्य करायचे. ग्राम पंचायत मध्ये नेहमी कर्मचारी हजर राहावे. ग्राम पंचायत बंद राहता कामा नये. अश्याप्रकरे आपले मत मांडले. नगभिड च्यां गट विकास अधिकारी खोचरे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्राम पंचायत नवेगांव पांडव च्या कार्याची स्तुती केली.कामाच्या संदर्भाने योग्य दिशेने ग्रामपंचायत ची वाटचाल असून माझ्या कडून जे सहकार्य लागेल ते मी ग्रामपंचायत नवेगांव पांडव ला करणार अशी ग्वाही दिली.
आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारे तालुक्यातील ग्रामपंचायत नवेगाव पांडव एकमेव गाव असून हे प्रमाणपत्र मिळाले गावात उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित श्री.संदीप भस्के उपविभागीय अधिकारी राजस्व ब्रम्हपुरी,कु.प्रणाली खोचरे गटविकास पंचायत समिती नागभिड, अँड शर्मिला रतनकुमार रामटेके सरपंचा ग्रामपंचायत नवेगाव पांडव, उपसरपंच विजय पंढरीनाथ बोरकुटे, ग्रामविकास अधिकारी नरेंद्र क्षीरसागर साहेब सदस्य सौ निरंजना सोनटक्के, सदस्य सौ.कल्पना नवघडे , सदस्य सौ.मिराबाई मसाखेत्री, सौ.मनिशा वासनिक मॅडम, आय.एस ओ समितीचे डायरेक्टर
वि .इ. कोल्हे सर , प्रीती गौतम मेश्राम व त्याची टिम उपस्थित होते. तसेच गणेश भुते, अक्षय सेवामेडका, शशीकांत राहाटे साहेब, दिवाकर नवघडे गुरूजी , बंनशीधर चुर्हे साहेब, श्रीमती इंदिरा वासुदेव नवघडे, पांडुरंग जी रामटेके, स्वप्निल नवघडे सर, सौ.मेश्राम मॅडम, श्री धोटे सर, श्री..कोरानकर सर आणि गावातील सर्व अंगणवाडी सेविका, मद्दतनिस,आशा वर्कर्स, सर्व युवा मित्रं, सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक बंधु ,भगिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी धनराज आंदोलने संघनक, विजय श्रीराम नवघडे,अतुल दादाजी पांडव, सोमेश्वर पांडव रोजगार सेवक यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाचे
प्रास्ताविक अँड शर्मिला रतनकुमार रामटेके यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन स्वप्निल नवघडे सर यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!