सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार. चिखल तुडवत करावा लागतो प्रवास.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार. चिखल तुडवत करावा लागतो प्रवास.
   (काम कासवगतीने , नागरिकांना भोगाव्या लागतात यातना .
बाळापूर -वाढोना -  जिवनापुर मार्गाचे काम कधी पूर्ण होणार ?  पुलाचेही काम अर्धवट. ! )

यश कायरकर,(तळोधी बा.):

       नागभिड  तालुक्यातील   बाळापूर ते वाढोना  मार्गे  जीवनापुर  पलजगाव जाट ला जोडणाऱ्या  रस्त्याचे काम  मागील दोन वर्षापासून सुरू असून  कामाची गती संथ व कासवगतीने असल्याने नागरिकांसह वाहन धारकांना  कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे  हल्ली पावसाचे तोंडावर  ठिकठिकाणी  पुलाचे काम सुरू केल्याने   ठिकठिकाणी रोडवर  खोदकाम  केल्याने   वाहन धारकांना अनेक अडथळ्याची शर्यत  पार करावी लागत असून  कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.  
नागभिड  तालुक्यातील  बाळापूर ते वाढोना  मार्गे पलजगाव जाट ला जोडणर्या  रस्त्याचे  काम मागील दोन वर्षापूर्वीपासून  कासवगतीने सुरू असून  काम सुरू असल्यापासून समधित  ठेकेदाराने  आकापुर, गंगासागर हेटी , ऊस्त्रालमेंढा, जिवनापुर  या गावाचे दरम्यान  फक्त गिटी पसरवून  ठेवली असून  यामुळे  दोन वर्षापासून वाहन धारकांना  गाडी चालवताना  अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.    गिट्टी पसरवून असल्याने रात्रौचे वेळेस  अनेक अपघात झाले असून  कित्येकांना  दवाखान्यात उपचार आर्थिक  भुर्दंड बसला असून  काहींना  अपंगत्व आलेले आहे .  त्यामुळे याला जबाबदार कोण ?  असा प्रश्न नागरिकांना पडत आहे  आता पुन्हा पावसाच्या उंबरठ्यावर  समांधीत ठेकेदाराने  ठिकठिकाणी  कोठे पुलाचे बांधकाम तर काही ठिकाणी  रस्ता फोडून पाईप टाकण्याचे काम सुरू केले आहे यासाठी  पाईप टाकत असलेल्या ठिकाणी  खोदकाम केलेले आहे  यामुळे वाहनधारकांना  वाहन चालविताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. समंधित प्रशासन  लोकप्रतिनिधींनी  रस्त्याचे जाळे ग्रामीण भागात पसरविण्यासाठी  'गाव तिथे रस्ता '  यानुसार  अनेक कामांना सूरवात केली  परंतु तालुक्यातील अनेक रस्त्याचे काम  कासवगतीने  सुरू आहेत  यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा  सामना करावा लागत आहे. 
      *"कामाची गती वाढविण्याची मागणी "!*
     मागील  दोन वर्षापासून  बाळापूर वाढोना   पलजगाव  जाट  मार्गाचे काम सुरू आहे मात्र समंधीत ठेकेदार  यांचे कडून चालढकल सुरू  असून काम पुर्णपणे कासवगतीने सुरू आहे दोन वर्ष होऊनही काम पूर्णत्वास आले नाही यात समंधीत विभागाची सांगड असल्याचा आरोप होत असून  यात  हल्ली ठिकठिकाणी पुलियाचे  काम सुरू असल्याने पाईप टाकण्यासाठी रस्ता खोदकाम केलेला आहे  त्यामुळे  कामाची गती वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे.      
         "पळसगाव‌ जाट व्हाया जिवनापुर, उसराळमेंढा, आकापुर, बाळापूर हा रोड/M.D.R.T.31,चे  साईड वाल चे काम पुर्णत्वास आले असून  आवश्यकता पेक्षाही  जास्त प्रमाणात C.D.Work चे काम करणं सुरू आहे, त्या ठिकाणी रस्त्यावर जागोजागी खोदकाम केलेले आहेत, त्यामुळे रस्त्यावर चिखल तुडवत नागरिकांना ये,जा करावी लागत आहे,बरेचदा  टू व्हीलर चालकांना     गाडी स्लिप होवून पडत आहेत, संबंधित कंत्राटदाराला याच्याशी बरेचदा सुचनाही  देवुनही दुर्लक्ष करतांना दिसत आहे, कंत्राटदाराच्या भोंगळ कारभारामुळे या मार्गावर धावणारी बस बंद झाली आहे, रस्त्यावर C.D.work करण्यात आले, त्यावर गिटी, मुरुमीकरण करून डांबरीकरण करणे,ते करण्यात  आले नाही,वाल चा  बाजूला नुसती माती भरण्यात आली, रस्त्यावर जागोजागी पाणी  साचले असून  , चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तात्काळ या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे" अशी मागणी वासुदेव गायकवाड माजी सरपंच, गंगासागर हेटी यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!