नागभीड तालुक्यातील 56 सरपंच व सदस्य जि. प. चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलना करीता रवाना. पथदिव्यांची बिल शासनाने भरण्याची मागणी.
यश कायरकर,;
ग्रामपंचायतीतील पथदिव्यांची विद्युत कनेक्शन कापल्यामुळे व जिल्हा परिषदेने विज बिल भरण्यास नकार दिल्यामुळे आज नागभीड तालुक्यातील 56 सरपंच व ग्रामपंचायत सदस्य 'जिल्हा परिषद चंद्रपूर' येथे ठिय्या आंदोलना करिता रवाना झालेले आहेत.
शासनाने काढलेल्या जी.आर. नुसार मार्च 22 पर्यंत पथदिव्यांच्या ग्रामपंचायत वर असलेले थकित बिल भरण्याचि प्रावधान स्वतः शासनाने केला असून, त्यानंतर उर्वरित बिल हे प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कोषातून भरावे असा जी.आर. काढला . मात्र त्यामुळे ग्रामपंचायतीन पुढे मोठा पेच निर्माण झाला.व आत्ता प्रत्येक ग्रामपंचायती वर मोठा आर्थिक भुर्दंड बसून ग्रामपंचायतला बिल भरणे अवघड जाणार. आणि आजपर्यंत शासनाने भरत आलेले पथदिव्यांची बिल हे नेहमी शासनाने भरावे असे सुचवून ग्रामपंचायतीने समोरील पथदिव्यांची विज बिल भरण्यास नकार दिला .
मात्र या गोष्टीमुळे विद्युत विभागाने विज बिल न मिळाल्यामुळे नागभीड तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचे पथदिव्यांची विज खंडित केली. आणि यामुळे नागभीड तालुक्यातील अठरा ग्रामपंचायत अंधारात बुडाल्या.
'यामुळे विद्युत विभागाने केलेले खंडित कनेक्शन हे पूर्ववत करावे व शासनाने पूर्णपणे ग्रामपंचायतच्या पथदिव्यांचे वीज बिल भरावे' असे मागणे घेऊन नागभीड तालुक्यातील संपूर्ण 56 ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य तसेच सिंदेवाही तालुक्यातील ही संपूर्ण सरपंच सदस्य यांनी आज जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलनाकरिता आपापल्या ग्रामपंचायत मधून कूच केलेली आहे. मात्र या मागणी, व मागणी पूर्ण न झाल्यास 27 जुन ला ठिय्या आंदोलन संदर्भात 21 जुन ला जिल्हा परिषद ला निवेदन सुध्दा या सरपंच संघटने तर्फे देण्यात आले होते.
यावेळेस नागभीड तालुक्यातील सरपंच यापैकी हेमंत लांजेवार , अमोल बावनकर ,देवेंद्र गेडाम, रवी निकुरे, कमलाकर खवले, गणेश गड्डमवर आनंद कोरे , शर्मिलाताई रामटेके, प्रशांत गायकवाड, रमेश घुगूसकर, दिलीप गायकवाड , हितेश कुंबरे ,शिला ठोंबरे , छगन कोलते , राजू घिये, निरंजना बावने, वैशाली गायधने,अनिता पेंदाम,इत्यादी नागभीड तालुक्यातील 56 सरपंचांनी यात सहभाग घेतलेला आहे.
नागभीड तालुक्यातील 56 सरपंच व सदस्य जि. प. चंद्रपूर येथे ठिय्या आंदोलना करीता रवाना. पथदिव्यांची बिल शासनाने भरण्याची मागणी.
Reviewed by
Public Media Group
on
जून २७, २०२२
Rating:
5
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!