वनविभागाकडून ग्रा.प. अर्जुनी तुकून कार्यालयात सभेचे आयोजन वेगवेगळ्या विषयावर घेण्यात आली सभा
वनविभागाकडून ग्रा.प. अर्जुनी तुकून कार्यालयात सभेचे आयोजन
शेगाव(जगदिश पेंदाम)
वरोरा तालुक्यामध्ये येत असलेल्या व ताडोबा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कोर मधील अर्जुनी तुकुम गावामध्ये वनविभाग कार्यालय वडाळा मार्फत सभेचे आयोजन अर्जुनी तुकुम ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात घेण्यात आली..
ताडोबा व्याघ्र प्रकल्पा जंगलालगत भानुशखिंडी बीटामध्ये येणाऱ्या हनुमान मंदिर हे परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असून हे मंदिर तेथून हटविण्यासाठी वनविभागामार्फ ग्रामपंचायत सभागृहात सभेचे आयोजन केले गेले होते या सभेला मार्गदर्शन करताना क्षेत्र सहाय्यक भानुसखिंडी रिठचे सतीश शेंडे यांनी हे मंदिर तेथून हटविले तर जंगलालगत असणाऱ्या गावांमध्ये मानव संघर्ष कमी होण्यास मदत होईल, तसेच ताडोबा फाउंडेशन यांच्या मदतीने गावामध्ये सुविधा पुरविण्यात येईल अशी नागरिकांना सभेमध्ये सांगण्यात आले मात्र गावातील नागरिकांनी याला तीव्र विरोध दर्शवत मंदिर तिथेच ठेवण्याची वनविभागाला यावेळी सांगण्यात आले आहे
अर्जुनी तुकुम गावातील नागरिकांचे तसेच परिसरातील शेतकऱ्यांची शेती ही भानुसखिंडी रिठात येत असून शेती निस्तारित जंगललागत असल्यामुळे येथील शेतकरी, नागरिक हनुमान मंदिराची पूजा करण्याकरीता जात असुन हे मंदिर पाचशे वर्षांपूर्वीपासून तिथे असल्याने याच्यावर परिसरातील जनतेची श्रद्धा असुन आजही मंदिरासमोर असणाऱ्या कुंडामधून शेतीपिकावरील रोगराई वेळी त्या ठिकाणी असणाऱे पाणी आणून शेती पिकावर शिंपण्याचं काम शेतकरी वर्गाकडून केले जाते, त्यामुळे परिसरातील नागरिकांचे हे श्रद्धास्थान बनले असून नागरिक तेथे पूजा करण्याकरता जात असतात..
सभेमध्ये गावकऱ्यांकडून हनुमान मंदिर हटवण्याकरीता विरोध दर्शवत शेतकऱ्यांना वनविभागानेच वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना सैर कुंपण करून शेतकऱ्यांना मदत करावे, पिकांचे नुकसान भरपाई द्यावी, सौर ऊर्जा लाईट गावालगत सभोवताली लावून त्यावर उपाय योजना तयार करून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करावा तसेच भानुसखिंडी रिठ गेट पर्यटन म्हणून सुरू करून येथील लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यावेळी गावकऱ्या मार्फत वनविभागाला सांगण्यात आले आहे...
या सभेला वनक्षेत्र सहाय्यक भानुसखिंडी रिठ सतीश शेंडे, वनरक्षक कोसुरकर,सरपंच यामिनी बोथले,उपसरपंच वामन ढोणे, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाठील झिंगरे, गावातील नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!