अव्वाच्या सव्वा दराने खत-बियाणे व बोगस कंपनीचे बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करू नका - शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांचे आवाहन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यात सध्या पेरणीची लागण सुरू असून शेतकरी खत बी-बियाणे खरेदी करीत असताना शेतकऱ्यांच्या शांततेचा फायदा घेऊन खत बी-बियाणे विक्री करणारे कृषी दुकानदार शेतकऱ्यांची अव्वाच्या सव्वा दराने लुट करत असल्याचे समोर आले आहे.कृषी दुकानदारांकडून होणारी शेतकऱ्यांची सर्रास लुट थांबवावी अशी मागणी शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.चिमूर तालुक्यात काही परिसरात शेतकऱ्यांना दिलासा देणार इतकाच पाऊस पडला असल्याने सर्व शेतकरी आनंद व्यक्त करीत सर्व शेतकरी आप आपल्या शेती मशागतीला लागले आहे. तर यात सर्व शेतकरी बंधू कर्ज बाजारी होऊन बी बियाणे खरेदी करून पेरणी करण्यात मग्न झाले आहे . कृषी सेवा केंद्राचे संचालक हे बोगस सोयाबीन चे बियाणे विकून फक्त आपल्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांची फसवणूक व दिशाभुल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक दिशाभुल न करता आपल्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांची लुबाडणूक न करता शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना प्रोत्साहन करा.व शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा. अव्वाच्या सव्वा दराने खत बी-बीयाणे विक्री सुध्दा थांबवा अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!