तळोधी (बा.) येथे कृषि संजिवनी सप्ताहा निमित्य " किसान गोष्टी कार्यक्रम" संपन्न
तळोधी(बा.)(यश कायरकर)
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषि अधिकारी कार्यालय नागभिड अतंर्गत कृषि तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) व्दारा खरीप हंगामात दि. 25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत "कृषी संजीवनी सप्ताह " साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत किसान गोष्टी हा कार्यक्रम साई सभागृह तळोधी(बा.)येथे आयोजित करण्यात आला.
सर्वप्रथम कै.वसंतराव नाईक यांच्या फोटो ला माल्यर्पण करून कार्यक्रमची सुरवात करण्यात आली.
कृषीसहायक सि.एस.दाडगे, यु.आर.मोहिते, वैभव गूडधे , निलेश घुगे, यांच्या द्वारे युरिया ब्रिकेट्स चा वापर, ऍझोला, दशपर्णी, जीवामृत तयार करणे व वापर, फळबाग लागवड, स्मार्ट, ई-पिक पाहणी, पीक संरक्षण, बीज प्रक्रिया या बाबत प्रात्यक्षिक करून सविस्तर माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक गायकवाड प्रगतशील शेतकरी, उदघाटक खोजराम मरसकोल्हे माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख पाहुणे शैलेश तिवारी, गजानन खोब्रागडे विस्तार अधिकारी पंचायत समिती नागभीड, डॉ नागदेवते कार्यक्रम समवन्यक कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही , कु पि.एस. शिंदे तालुका कृषी अधिकारी नागभीड, कु.येवले कृषी पर्यवेक्षक, संजय पाकमोडे कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन जितेद्रं कावळे (आत्मा.) बी.टी.एम. नागभीड, तर आभार प्रदर्शन ए.के.शिरसाट यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!