सावरी गावात पसरले घाणीचे साम्राज्य

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
 
सावरी : - चिमूर तालुक्यातील सावरी (बिड ) ग्रामपंचायत हे नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते स्वच्छता, पाणी, अतिक्रमण आदी प्रश्नांमुळेही ही ग्रामपंचायत चर्चेत आहे. अशातच येथिल दोन वर्षे पासुन नाली सफाई करण्यात आलेली नाही त्यामुळे सावरी गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे . पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून, रोगराई पसरायला सुरुवात होत आहे.त्यातच सावरी ग्रामपंचायत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार  ग्रामपंचायतकडे तक्रार करुनही ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नाली सफाई करण्यात यावे. अशी मागणी सावरी येथिल सामाजिक कार्यकर्ते गुणवंत्त नवले,प्रहार सेवक,मुरलीधर रामटेके,मिलिंद खोब्रागडे , नारायण निखाडे, रमेश वाकडे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या कडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!