राजकीय ब्रेकिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा

राजकीय ब्रेकिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा


मागील एक आठवड्यापासून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह बंड केल्याने उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे.  मुख्यमंत्री पदासह विधान परिषद सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.
राज्यपालांनी उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्यपालाचे आदेशावर शिक्कामोर्तब केल्याने,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत असल्याचे फेसबुक लाईव्ह द्वारे जाहीर केले. आहे तसे राजीनामा पत्र  राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे राजभवनावर जाऊन देणार आहे.
 यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गट यांची युती होऊन सरकार स्थापन होण्याचा मार्गही यानिमित्ताने मोकळा झाला आहे.
उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांना परत येण्याचे भावनिक आवाहन केले होते. परत येऊन चर्चा करा मार्ग काढू असे आवाहन केले होते. मात्र या आवाहनाचा कोणताही परिणाम बंडखोरावर पडला नाही अखेर अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!