जांभुळघाट येथील शासकीय आश्रमशाळेच्या वॉलकम्पाउंडचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे
अनेक ठिकाणी पडल्या भेगा
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथील शासकिय आश्रमशाळेच्या वॉलकम्पाउंडचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले आहे.मागील एक ते दोन महिण्यापुर्वी कंत्राटदाराद्वारे या वॉल कम्पाउंडचे बांधकाम करण्यात आले होते.सदर बांधकामामध्ये वापरण्यात आलेले साहीत्य पुरेश्या प्रमाणात वापरण्यात आलेले नाही.त्यामुळे सदर बांधकामाचे मजबूतीकरण झालेले नाही.म्हणूनच या वॉलकम्पाउंडला अनेक ठिकाणी भेगा पडण्यास सुरवात झाली आहे.सरकार च्या लाखो रूपयाच्या निधीचा दुरुपयोग होत आहे.अभियंता व अधिकाऱ्यानी याकडे लक्ष देऊन चौकशी करून,कंत्राटदारावर योग्य कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!