८ दिवसा पासून सावरी परिसरात विजेचा लपंडाव सुरू - प्रहार सेवक विनोद उमरे
विद्युत अधिकारी मस्त आणि ग्राहक त्रस्त
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - सावरी परिसरात विजेची समस्या कायमस्वरूपी सुरू आहे या समस्याकडे अधिकारी यांनी लक्ष देऊन ग्राहकांच्या समस्या सोडवायला हव्या सावरी परिसरातील १२ गावांना या विजेचा नेहेमी फटका बसत रहातो पावसाची एक झळक आणि रात्र भर लाइट बंद हि समस्या कायमस्वरूपी असून शनवारी झालेल्या अल्पशा पावसातच वीज वितरण कंपणीच्या भोंगळ कारभार दिसून आला.शनिवार सायंकाळी ६.३० वाजेपासून पावसाला सुरुवात झाली १०-१५ मिनिटांच्या पावसातच वीज गेली तेव्हापासून तर सावरी परिसरातील १२ गावे अंधारातच आहे.सावरी (बिड) येथे प्रशासकीय कार्यालय आहे.भारतीय स्टेट बँक, दोन ग्राहाक सेवा केंद्र, पोस्ट आफिस, प्राथमिक आरोग्य सुध्दा आहे. विजेचे लपंडाव सुरु असल्यामुळे प्रशासकीय कार्यालयाच्या बाहेर रांगा लागत आहे.यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्राहास सहन करावा लागत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!