देवयानी इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

देवयानी इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

सिंदेवाही:- दिनांक २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो,त्यानिमित्त देवयानी इंटरनॅशनल स्कूल सिंदेवाही येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.  
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमात योगशिक्षिका सौ .सैनी मॅडम यांना आमंत्रित केले होते आणि यांच्याकडून विद्यार्थ्यांनी योगाचे धडे घेतले तसेच विद्यार्थ्याना योगाचे महत्व पटवून दिले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंदेवाही नगरपंचायत चे नगरध्यक्ष श्री .स्वप्नीलजी कावळे हे उपस्थित होते ,त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले.कार्यक्रमाचे संचालन शाळेचे सहाय्यक शिक्षक जगदीश मदनकर यांनी केले.शाळेच्या प्राचार्या सौ.शैलेजा पाटील मॅडम आणि उपप्राचार्य श्री.निखिल तूकदेव सर यांनी  आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!