महावितरणच्या अधिकाऱ्यांची दिरंगाई जीवावर बेतणार -

महावितरणच्या अधिकाऱ्यांची दिरंगाई जीवावर बेतणार -

 घरावरून गेलेल्या जिवंत तारा मुळे जीव धोक्यात

 जिवंत विज तारांचा धक्का लागुन एका वानराचा जिवही गेला.

सिंदेवाही. 
     महावितरण चे अधिकारी व कर्मचारी विद्युत बिलाच्या वसुलीसाठी सक्त व कर्तव्यदक्ष असतात. बिल न भरल्यास विद्युत पुरवठा कापण्यासाठी सदैव तत्पर असतात परंतु समस्या सोडवण्यासाठी मात्र वेगवेगळी कारणे सांगून समस्या जटिल करण्याचा प्रयत्न करतात.  
स्थानिक जयस्वाल कॉलनी मधील तीन घरांच्या वरून विद्युत तारा गेलेले आहेत तसेच या ठिकाणचे दोन पोल वॉल कंपाऊंड च्या आत मध्ये आहेत. सदर पोल हटवण्यासाठी एक वर्षापासून महावितरण चे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याची तक्रार या कुटुंबाने केलेली आहे.

     अजय  दडमल, अशोक भवानी व रोहिले हे कुटुंब जयस्वाल कॉलनीमध्ये राहतात. या ठिकाणी तेव्हाच्या विद्युत विभागाने विजेचे दोन पोल वॉल कंपाऊंड च्या आत मध्ये लावले. या कॉल वरून गेलेल्या विद्युत तारा या तीनही घरांच्या वरून गेलेले आहेत. स्लॅप वर वावरत असताना किंवा काम करत असताना सहजपणे जिवंत तारांना स्पर्श होऊ शकतो. त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सदर ठिकाणी असलेले दोन पोल रस्त्याच्या कडेला घेणे आवश्यक आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन दडमल, भवानी व रोहिले यांनी मागील वर्षी सदर  पोल हटविण्यासाठी रीतसर महावितरण विभागाकडे अर्ज सादर केला. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांना ही समस्या गंभीर वाटली नाही व त्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. अर्जदारांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांची भेट घेतली असता पोल हटवण्यासाठी येणारा खर्च तुम्हाला भरावा लागेल त्यासाठी 50 हजार रुपये भरावे लागेल असे सांगितले. एवढी मोठी रक्कम ऐकून अर्जदार यांनी असमर्थता दर्शविली. त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून डीपीडीसी योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवू रस्ता मंजूर झाल्यानंतर पोल रस्त्याच्या कडेला घेण्यात येईल असे सांगितले. परंतु एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेला तरी प्रस्ताव मंजूर झालेला नाही किंवा कोणीही अधिकारी प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही. अशी तक्रार सदर कुटुंबाची आहे. 
     या कुटुंबीयांनी ही समस्या नगरपंचायत कडे मांडली. नगरपंचायत मोका चौकशी करून महावितरणला सदर पूल हटविण्याची सूचना केली. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखवली. असाच पोल हटविण्यासाठी महावितरणने इतरांकडून सात हजार रुपये खर्च म्हणून वसूल केल्याचे माहिती अधिकारातून माहिती मिळाली. इतर लोकांकडून 7000 तर आमच्याकडून 50000 खर्च का? असा प्रश्न तक्रारकर्ते विचारीत आहेत. महावितरणचे अधिकारी जाणून-बुजून या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत परंतु त्यांच्या दुर्लक्षित पणामुळे तीनही कुटुंब भीतीमध्ये वावरत आहेत. तारेला चिपकून मनुष्य हाणि  झाल्यावर अधिकारी जागे होतील का? मनुष्य हानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
प्रस्ताव मंजूर होताच  पोल हटवू:- गायधने
     महावितरणचे अधिकारी श्री गायधने यांच्याशी संपर्क साधला असता सदर पोलची चौकशी केलेली आहे. डीपीडीसी योजनेअंतर्गत पोल हठवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवलेला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पोल हटविण्यात येईल असे सांगितले. 
    बातमीच असतानाच वानराचा करंट लागून मृत्यू
     बातमी लिहीत असताना पावसाची रिप रिप सुरू होती. वानरांचा कळप अजय दडमल यांच्या घरावर बसलेला होता. त्यापैकी एका वानराचा स्पर्श घरावर असलेल्या विद्युत तारांना झाला. करंट लागून त्या वानराचा मृत्यू झाला. अशीच वेळ याठिकाणी राहणाऱ्या लोकांवर येऊ शकते. परंतु मित्र विभागाला त्याच्याशी काहीही सोयर सुतक नाही असे दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!