जन्मदाता
जन्मदाता
आई माझी जननी,
बाबा माझे आदर्श आई प्रेमाची सावली
बाबा सामर्थ्यचे विश्व.
तुम्ही त्यागले आयुष्य
फुलविले माझे भविष्य.
तुम्हा चरणी लीन व्हावे
लाभे संसार सुख.
देवा, विनवितो तुम्हास
सुंदर जीवन दे त्यास.
नको ते सुख मला ज्यात नसेल त्यांची साथ.
आई. करुणार्थ तुझे रूप.
ध्येयार्थ, ज्ञानार्थ बाबा वाटे
तुमचे व्यक्तित्व.
आईबाबा ! दिसे ना वाट,
सोडू नका हात, मला हवी आहे साथ
. सुहानी येलूरे
नागपूर वय 13 वर्षे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!