यवनाश्व गेडकर यांच्या अनुभव कथन लेखसंग्रहात स्थानिक भागाचे यथार्थ वर्णन - बंडोपंत बोढेकर



 यवनाश्व गेडकर यांच्या अनुभव कथन लेखसंग्रहात स्थानिक भागाचे यथार्थ वर्णन - बंडोपंत बोढेकर 
शाहु महाराज जयंती : आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार 

चंद्रपूर (प्रतिनिधी)- 

    झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने       सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक  यवनाश्व गेडकर यांच्या 'स्मृती सुगंधाची गुंफण ' या अनुभव कथन लेखसंग्रहाचे प्रकाशन  गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांचे हस्ते श्रमिक पत्रकार भवनात झाले. अध्यक्षस्थानी साहित्यिक ग्रामगीताचार्य  बंडोपंत बोढेकर होते. तर भाष्यकार म्हणून डॉ. प्रा. धनराज खानोरकर , झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाप्रमुख अरूण झगडकर, लेखक यवनाश्व गेडकर, सचिव नारायण सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. अनिल चिताडे म्हणाले, लेखकांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीतून या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या, येथील प्राचीन भौगोलिक प्रदेश , आपल्या  लोकपरंपरा यावरही आवर्जून प्रकाश टाकला पाहिजे.  विद्यापीठाच्या  संशोधकांनी सुध्दा आपल्या भागातील  विषय  संशोधनासाठी निवडला पाहिजे, असे ते म्हणाले. डॉ. खानोरकर म्हणाले, स्मृती सुगंधाची गुंफण या पुस्तकात  गेडकरांनी आपले जीवनानुभव  उत्तमरित्या शब्दबध्द केलेले असून ते वाचकांना उर्जा देणारे आहे. ग्रामगीताचार्य बोढेकर म्हणाले, गेडकराचे लेखन सत्यावर आधारित असून मनाला स्पर्श करणारे आहे.  या  अनुभवकथनात अनेक कथांची बीजे दिसून येतात. प्रास्ताविक अरूण झगडकर यांनी केले तर मनोगत यवनाश्व गेडकर यांनी मांडले. राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या श्रमिक पत्रकार  भवनात संपन्न झालेल्या  या कार्यक्रमात आचार्य पदवी प्राप्त डॉ. गोपीचंद रामटेके, डॉ. श्रावण बानासुरे , डॉ. अजय दहागावकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या  रा.ज. बोढेकर स्मृती ग्राम साहित्य पुरस्कार  लक्ष्मण खोब्रागडे मुल , सौ. प्रिती जगझाप बल्लारपूर ,सौ. भारती तितरे चामोर्शी, संजिव बोरकर गडचिरोली यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  विलास उगे, अभय घटे,बंडू टेकाम, प्रा. मोरे , सुनील बावणे, संतोष उईके, डॉ. गांवडे , राकेश बोबडे, खेमदेव कन्नमवार आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!