पाण्याची मोटर चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक
नेरी पोलिसांची कारवाई
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.२६/०६/२०२२ ला नेरी पोलीस चौकी याठिकाणी बाळकृष्ण शामराव नन्नावरे राहणार नेताजी वार्ड नेरी यांनी घरची पाण्याची कॉलिन कंपनीची इलेक्ट्रिक मोटार १५०० रुपये किंमतीची चोरी गेली याची तक्रार दिली असता.पोलीस उप निरीक्षक अलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.मोहन धनोरे , ना.पो.शी.भारत पुसांडे , ना.पो.शी.पमोद पडाल ,पो.प्रमोद गुट्टे यांनी तपास घेत आरोपी क्रमांक (१) सचीन दामोधर नन्नावरे वय २५ वर्षे राहणार नेताजी वार्ड नेरी (२) नितीन दामोधर नन्नावरे वय २७ वर्षे राहणार नेताजी वार्ड नेरी या दोन्ही आरोपींना मुद्देमालासह अटक केली.कलम ३७९ / ३४ अ. प. २००/२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी चिमूर येथील JMFC कोर्टात नेण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!