मूल बस स्थानकावरील पाणपोईचे आजीबाईच्या हस्ते उदघाटन, रत्नावार यांचा पुढाकार

मूल बस स्थानकावरील पाणपोईचे आजीबाईच्या हस्ते उदघाटन, रत्नावार यांचा पुढाकार

मूल प्रतिनिधी

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून अंगाची लाही लाही होत आहे. मूल च्या बस स्थानकावर हजारो प्रवाशी येतात. अश्या परिस्थितीत बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाश्याना बस स्थानकावर थंड पाण्याची सोय उपलब्ध नाही. पाणी हेच जीवन आहे. ग्रामीण भागातील प्रवाशी शेतकरी, शेतमजूर, गरीब वर्ग आहे. पाणी विकत घेऊन पिऊ शकत नाही. त्यांना आर्थिक त्रास सोसावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेता आणि वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नावार यांनी ये जा करणाऱ्या प्रवाशानकरीता थंड पाणपोईची  सोय उपलब्ध करुन दिली.पाणपोईचे उदघाटन चिचाळा येथील प्रवाशी आजीबाई कमलाबाई वाढई चिचाळा हिच्या हस्ते रत्नावार यांच्या माध्यमातून सुरु केलेल्या पाणपोईचे उदघाटन करुन प्रवश्याना पाण्याची सोय करुन दिली. यावेळी पाणी पिऊन तृप्त झालेल्या, तहानलेल्या नागरिकांनी आभार मानत आशीर्वाद दिला.यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल शेरकी,शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे,विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक विवेक मुत्यलवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश फुलझेले, शहर संघटक गणेश रणदिवे,पदाधिकारी रंजीत आकुलवार, अभिजित चेपुरवार, गौतम जिवणे, संजय भुसारी,सचिन मुळेवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!