राकेश रत्नावार यांच्या वाढदिवसानिमित्य रुग्णांना फळ वाटप

राकेश रत्नावार यांच्या वाढदिवसानिमित्य रुग्णांना फळ वाटप

मूल प्रतिनिधी 

संजय गांधी निराधार योजनेचे मूल तालुका अध्यक्ष, मूल नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे महासचिव राकेश रत्नावार यांच्या वाढदिवसा निमित्य मूल शहरात मोठ्या उत्साहात, थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला.
राकेश रत्नावार यांचे कार्यकर्त्यांनी मूल येथील कर्मवीर मैदानावर सकाळी पोलीस भरती, सैनिक भरती करिता सराव करणाऱ्या युवकांना, खेळाडूंना एनर्जी ज्यूस,बिस्कीट चे वाटप करण्यात आले. युवकांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. 
मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या सख्येनी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे,विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक विवेक मुत्यलवार, शहर संघटक गणेश रणदिवे, पदाधिकारी रंजीत आकुलवार, अभिजित चेपुरवार, गौतम जिवणे,सचिन मुळेवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!