सोनेगांव प्रभागातील पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे
सुधाकर निवटे शिवसेना उपतालुका प्रमुख यांनी नगर परिषदेला केली तक्रार दाखल
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमुर नगरपरिषद क्षेत्रातील सोनेगांव प्रभागात पानी पुरवठा टाकीचे बांधकाम सुरु असून ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून झालेल्या बांधकामावर पानी न मारताच टाकीचा पायवा रचला गेला, तसेच सिमेंट, लोहा, सुध्दा निकृष्ट दर्जाचा वापरला आहे.२१ दिवसांपासून पानी पुरवठा टाकीचे काम बंद असून या बन्द कामामुळे उभ्या असलेल्या सलाखीमुळे नागरिकांना शारिरिक ईजा होण्याची दाट शक्यता आहे, या संदर्भात शिवसेना उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे यानी चिमुर नगर परिषद ला लेखी तक्रार दिली असून, या तक्रारी वरुण निकृष्ट प्रतीचे झालेले बांधकाम तोडून नवींन बांधकाम करुण न दिल्यास व ठेकेदारावर कार्यवाही नाही झाल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करू असा इशारा शिवसेना उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे यानी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!