अखेर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आज औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे आणि राजीव जवळेकर यांचेसह इतरांवर हा गुन्हा दाखल केला आहे. राजीव जवळेकर हे सभेचे आयोजन आहेत. त्यांनी सभेची परवानगी घेतली होती.
सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंंद करण्यात आली. औरंगाबाद मधील सभी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
५५ डेसिबल साऊंड मर्यादेची मर्यादा आखून दिली होती मात्र त्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केले आहे.
प्रक्षोभक भाषण दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सिटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन इंगळे यांनी हा एफ आय आर दिला आहे दिला आहे.
भादवीचे कलम ११६, ११७, १३५, १५३, १५३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सायबर ॲक्ट अंतर्गत ही काही गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.
सरकारचा पोलिसांवर दबाव असल्याने चा गुन्हा दाखल झाल्याची प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!