मूलचे महसूल कर्मचारी संपावर, संपाचा पाचवा दिवस
मूलचे महसूल कर्मचारी संपावर, संपाचा पाचवा दिवस
मूल (अमित राऊत)
विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचार्यांनी पाच दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे ग्रामीण आणि शहरातून आलेल्या नागरिकांचे या संपामुळे अडचण निर्माण झाली आहे . कोणत्याही विभागात कर्मचारी जागेवर नसल्यामुळे बहुतांश नागरिकांची कामे जागेवरच थांबली आहेत. त्यामुळे रिकाम्या खुर्च्या आणि ओस पडलेली कार्यालय अशी स्थिती तयार झाली आहे.
जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जाणार नाही असा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.
महसूल सहाय्यक वाहन चालक, तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मागील पाच वर्षात पदोन्नती मिळालेली नाही, अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती मिळालेली नाही. नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती द्या, वर्ग 3 व वर्ग 4 चे रिक्त पदे तात्काळ भरा, अस्थायी पदे कायम करा, गृहविभागाच्या धर्तीवर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करा, कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी मध्ये पदोन्नती द्या, यासह इतर अनेक मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कर्मचारी संपावर आणि कार्यालय वाऱ्यावर अशी अवस्था निर्माण झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे तहसिल कार्यालयातील विविध योजनांचे कामकाज प्रभावित झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!