चिमूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शरदचंद्र पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा केला निषेध

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - शरदचंद्र पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सिल्वर ओक मुंबई येथील निवास्थान येथे एस.टी. कर्मचाऱ्यांना पुढे करून राजकीय द्वेषातून भ्याड हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या निषार्थ चिमूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तहसिल कार्यालय तसेच एस.टी. डेपो समोर शरदचंद्र पवार यांच्या सिल्वर ओक मुंबई येथील निवास्थानी ज्यांनी हल्ला चढवला त्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी नारेबाजी करून निषेध करण्यात आले. यावेळी राजु मुरकुटे तालुका अध्यक्ष , युवक चिमूर तालुका अध्यक्ष मनीष वजरे , रमेश खेरे तालुका अध्यक्ष सेवा दल , स्वरूप तळवेकर तालुका उपाध्यक्ष युवक , अनिल रामटेके रा. कॉ. चिमूर शहर अध्यक्ष , गणेश चौधरी ओ.बी सी. तालुका अध्यक्ष , राहुल राणे चंद्रपूर जिल्हा सचीव युवक , रामु चौधरी तालुका उपाध्यक्ष , मैबुबभाई शेख तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक , विठ्ठल पेंदाम  हेमंत समर्थ , नरेंद्र दड्मल व आदी कार्यकते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!