अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा

तळोधी बाः 
      नागभीड तालुक्यात येत असलेल्या बालापूर बु.येथील घरासमोरील नवीन घराच्या बांधकाम करण्यासाठी रेतीचे ढिगारे असलेल्या ठिकाणी बालापुर येथील ८वर्ष व ७ वर्ष  अल्पवयीन मुली खेळत असताना   आरोपी टिलकचंद रघुनाथ अग्नीकर वय ५५ वर्ष रा.बालापूर तह.नागभीड यांनी अल्पवयीन असलेल्या दोन्ही मुलींना १०-१० रुपयाचे आमीष दाखवून नवीन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी  लैंगिक अत्याचार केला. त्या तक्रारी वरुन पोलिस स्टेशन तळोधी बा.येथे अपराध क्र १०३/२०१८ भांदवी कलम ३७६(२)आय जे सहकलम ६ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .
         तपास अधिकारी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रंशात परदेशी यांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी विरुध्द ठोस पुरावे सादर करण्यात आले.यावेळी जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीविरुध्द कारवाई व्हावी म्हणून सरकारी वकील अंँड.महाजन व अँड .स्वाती देशपांडे यांनी बाजू सांभाळली.त्या मुळे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी आरोपीविरुध्द शिक्षा ठोकून २० वर्ष सजा व ५००० दंड न भरल्यास वर्ष भरात वाढ करण्याचा निर्णय देण्यात आला.आरोपी विरुध्द कारवाई केल्याने नागरिकांनी न्यायालयाचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!