सरपंच महिला झाली रेती माफिया
चिमूर तालुक्यातील घटना
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील अमरपुरी मजरा हि गट ग्रामपंचायत आहे. येथे महिला सरपंच पदावर आहे. आणि यांचा व्यवसाय बघावं तर चोरीची रेती विक्री याबाबत सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दैनंदिन चर्चा सुरु असून या महिला सरपंचच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. काही दिवसा अगोदर देशोन्नती या दैनिक वृत्तपत्रात अवैध रेती तस्करांकडून वसुलीचे संभाषण वायरल झाल्याने वनविभागात खळबळ , महिला वनरक्षक तसेच महिला सरपंचामध्ये झाले संभाषण , रेती वाहतुकीसाठी महिला वनरक्षकाची रेती तस्करांकडून वसुली अशा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या याबाबत वनविभागामार्फत महिला वनरक्षक यांचेवर कारवाई चे आदेश सुध्दा देण्यात आले. अशीही माहिती मिळाली. परंतु सरपंच महिलेवर कारवाई चे कुठलेही आदेश निघाले नाही. जेव्हा कि सरपंच यांचे अधिकार व कर्तव्ये हे ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व त्याचे अध्यक्षस्थान भूषविणे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं संरक्षण करणे. गावातील विविध गावसमीत्यांचे (तंटामुक्ती, ग्राम शिक्षण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती इत्यादी) अध्यक्षपद भूषविणे हि कर्तव्ये असतांना चक्क सरपंच चोरीची रेती विक्री चा व्यवसाय करत असेल तर काय ? याकडे संवर्ग विकास अधिकारी , तहसीलदार , उपविभागीय अधिकारी यांचे सुध्दा दुर्लक्ष का ? याबाबत अजूनही शासनाकडून चौकशी का नाही ? याकडे वनविभाग प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!