जनकापुर येथे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते आठवडी बाजाराचा शुभारंभ उमेद , ग्रामपंचायत जनकापुर व आधार महिला ग्रामसंघाचा पुढाकार

जनकापुर येथे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते आठवडी बाजाराचा शुभारंभ
 उमेद , ग्रामपंचायत जनकापुर व आधार महिला ग्रामसंघाचा पुढाकार
                  
तळोधी बा 
आठवडी बाजाराचे उद्घाटन भाजपा जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जनकापुरचे उपसरपंच महेश रामटेके हे होते . 
                 या वेळी गावातील १२ स्वयंसहायता समूहातील महिला व गावातील नागरिक उपस्थित होते. 
            आठवडी बाजार सुरू करण्यामागचा उद्देश गावातील उत्पादीत मालाची गावात विक्री करता यावी, दळणवळणाचा खर्च कमी व्हावा हा आहे. असे प्रतिपादन संजय गजपुरे यांनी यावेळी केले. 
             कार्यक्रमाचे संचालन बचटगटाच्या वर्धिनी कु.देवता सुर्यवंशी व प्रास्ताविक  पत्रकार राहुलजी रामटेके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार आरोग्य सखी सौ.प्रविणा रामटेके यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!