बालकांसोबत कुकर्म करणाऱ्या नराधमाला जमावाने झोडपले

बालकां सोबत कुकर्म करणाऱ्या नराधमाला जमावाने झोडपले


सिंदेवाही (शशिकांत बतकमवार)

     आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला जमावाने चांगलेच झोडपून काढले आणि पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना काल रात्री साडेआठ वाजता घडली. 
सविस्तर वृत्त असे की काल (दि. 28) महात्मा फुले चौकातील तिसऱ्या वर्गात शिकणारा पप्पू (नांव बदलविले) आणि मोंटू (नाव बदलले) हे दोघेही घराजवळ खेळत होते. यावेळी थामदेव मेंढूळकर वय 41 रा. नागपूर हा व्यक्ती त्या मुलांना मी तुमच्या घरचा पाहुणा आहे चला तुम्हाला चप्पल व घड्याळ घेऊन देतो अस सांगून सोबत घेऊन गेला. चप्पल च्या दुकानात त्यांना सॅंडल घेऊन दिली  हॉटेलमध्ये रूम नंबर 102 मध्ये निघून गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या बालकांना कपडे काढायला लावले. त्यांच्यासोबत दुष्कृत्य करायला सुरुवात केली. मोंटू नावाच्या मुलाने मला संडास लागली असे सांगून नराधमाच्या तावडीतून सुटका केली. संध्याकाळ झाली तरी मुले घरी आली नाहीत म्हणून आईवडिलांची शोधा शोध सुरू झाली. बस स्टँड जवळ मुलांची शोध घेत असताना घाबरलेल्या अवस्थेत मोंटू येताना दिसला. मोंटूला विचारणा केली असता त्याने पप्पू हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले. पप्पूचे वडीलानी त्या मुलाला घेऊन रूम नंबर 102 च्या दारावर थाप दिली. परंतु दरवाजा उघडल्या जात नव्हता. हॉटेल मालकाला सांगण्यासाठी किशोर खाली उतरत असताना गावातील मिथुन मेश्राम, अमन भाई व इतर वर येताना दिसले. सर्वांनी पुन्हा एकदा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला  तेव्हा दरवाजा उघडला गेला. पप्पू रडत असल्याचे दिसून आले. त्याने आपल्या वडिलांना व इतरांना आप बीती सांगितले. संतापलेल्या जमावाने आरोपीला चांगलेच झोडपून काढले व पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीचे वीस वर्षांपूर्वी सलून चे दुकान सिंदेवाही असल्याचे समजते. आरोपीविरुद्ध भादवि कलम 363, 377, बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण अधिनियम कलम सहा नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!