तळोधी येथील भाजप सरपंचाचे काँग्रेसमध्ये प्रवेश
तळोधी (बा.)(यश कायरकर)
आज दि.२९/०३/२०२२ ला नागभिड तालुक्यातील सर्वात मोठी असलेली ग्रां.पं.तळोधी येथील भाजप सरपंच सौ.छायाताई मदनकर व ग्रां.प.सद्स्य किशोरजी कटारे, यांनी तालुका काँग्रेस कार्यालय नागभीड येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केले,याप्रसंगी चिमुर विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा मा.जि.प.अध्यक्ष,गटनेते डाँ.सतिशभाऊ वारजूकर यांनी काँग्रेस कमेटीचा दुपट्टा टाकुन त्यांचे स्वागत केले.यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी,उपाध्यक्ष रमेशभाऊ ठाकरे,नागभीड न.प.काँग्रेस गटनेते संजयभाऊ अमृतकर,चिमुर विधानसभा युवक महासचिव अमोलभाऊ वानखेडे, तळोधी गोविंदपूर जि.प.काँग्रेसचे सद्स्य बल्लुभाऊ गेटकर,तळोधी ग्रा.पं.सद्स्य विलासभाऊ लांजेवार,डोनूभाऊ पाकमोडे,सौ.विजयाताई वाढई,सौ.वंदनाताई चचाणे,सौ.ज्योतीताई मडावी,सौ.रेखाताई मेश्राम, नागभीड न.प.समन्वयक हरिषभाऊ मुळे,वाकर्ला सरपंच दिनकरजी सिंगारे, किशोरभाऊ समर्थ,तसेच काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!