उश्राळ मेंन्ढा येथे ग्रामपंचायत भवनाचा नुतनीकरण लोकार्पण सोहळा पार पडला

उश्राळ मेंन्ढा येथे ग्रामपंचायत भवनाचा नुतनीकरण लोकार्पण सोहळा पार पडला 


 तळोधी बा.:
       
         नागभीड तालुक्यातील उश्राळ मेंन्ढा येथील ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण नुतनीकरण सोहळा पार पडला.  विशेष म्हणजे ऊश्राळा मेंढा येथील ग्रामपंचायत ची जुनी इमारत जिर्न झाल्यामुळे दहा वर्ष पर्यंत ग्रामपंचायतचे कारभार हे समाज भवनामध्ये चालवण्यात येत होते.  मात्र लोकनियुक्त सरपंच हेमंत लांजेवार यांनी  पाठपुरावा करून या इमारतीचे बांधकाम केले. व ग्रामपंचायत कार्यालयीन कामासाठी आज या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्धाटक   श्री.प्रफुलभाऊ खापर्डे, सभापती,पं.स.नागभीड. तर अध्यक्ष  सौं.नैनाताई गेडाम, सदस्य,जि.प.चंद्रपुर. 
 सौ. रागीनीताई गुरपुडे, उपसभापती पं.स.नागभीड.
  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  श्री.डाॅ.सतिशभाऊ वारजुरकर, गटनेता.जि.प. चंद्रपूर.
 श्री.खोजरामजी मरस्कोल्ले, सदस्य.जि.प.चंद्रपुर श्री.विनोदभाऊ बोरकर, अध्यक्ष सं.गा.नि.यो.नागभीड तालुका श्री.शामसुंदर पुरकाम,सदस्य,पं.स.नागभीड कु.प्रणालीताई खोचरे,संवर्ग गटविकास अधिकारी,पं.स.नागभीड
तर  कार्यक्रमाचे आयोजन
श्री. हेमत लांजेवार लोकनियुक्त सरपंच उश्राळ मेंन्ढा, श्री.जयेश लोंढे उपसरपंच, श्री.वाय जी कापगते सचीव यांनी केले.
             प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते  रिबीन कापून कार्यक्रमाला सुरुवात करन्यात आली.  प्रमुख पाहुण्याना शाल,व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.       
             कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने पार पाडण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!