शहीद वीर बाबुराव शेडमाके यांची 189 वी जयंती संपन्न



शहीद वीर बाबुराव शेडमाके यांची 189 वी जयंती शहीद बाबुराव शेडमाके बहुद्देशीय संस्था जानाळा तर्फे कार्यालय मूल येथे आनंदोत्सवात समस्त आदिवासी समाजाच्या उपस्थितीत साजरी झाली. या प्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थी, दर्शन दीपक कुळमेथे, आणि स्नेहल एकनाथ गेडाम यांनी नीट परीक्षा पास करून MBBS साठी प्रवेश मिळवला, त्यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. तसेच परब्रह्मनंद मडावी सर साहित्यिक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. राधाबाई सोयाम अध्यक्ष शाहिद बाबुराव शेडमाके यांनी सर्वांचे आभार मानले. संचालन अशोक अलाम सरांनी केले. या प्रसंगी भागवत कुमरे, उत्तम कुमरे, अशोक येरमे, इंद्रपाल कुळमेथे, गिरीराज पेंदाम, भारत सलाम, वैशाली सोयाम, उज्वला सोयाम, भोजराज कोरवते, रामचंद्र मेश्राम, मारोती जिल्हेवार, किशोर उरकुंडवार, चंदन बिलवने,खुशाल मांदाडे, सुरेश जिल्हेवार,निशा उईके, रत्नमाला गेडाम, विद्या कोसे अरविंद मेश्राम, बालस्वामी कुमरे, भोजराज, भेंडारकर, शंकर बोरकुटे, किशोर नरड, सी. पर्वते, विक्रांत रामटेके, सुहास पुप्पलवार,अभिषेक पेंदाम, आणि समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!