वाघाच्या जखमी बछड्याला पकडून, उपचाराकरिता चंद्रपूरला केले रवाना.
वाघाच्या जखमी बछड्याला पकडून, उपचाराकरिता चंद्रपूरला केले रवाना.
तळोधी (बा.):
तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत कच्चेपार बीट कक्ष क्रमांक 67 मध्ये काल दुपारला एका मेंढपाळाला वाघाने किरकोळ जखमी केल्याची घटना घडली. त्या नंतर त्या बीटाचे प्रभारी वन रक्षक एस.एस. गौरकर, व क्षेत्र सहाय्यक राजेश्वर गायकवाड हे घटनास्थळी मोका पंचनामा करायला गेले असता. झुडपात बसून असलेला वाघ जखमी असल्याचा निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना कळवले.
ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी चे बायोलॉजिस्ट राकेश आहुजा यांनी येऊन चौकशी केली असता वाघाचा बछडा जखमी असल्याचे व अशक्त झाल्याचे दिसून आले. त्यानंतर चंद्रपूर चे टि. ए. टी. आर. चे पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोबरागडे , अजय मराठे पोलीस कॉन्स्टेबल व आर.आर. टी. सोबत घेऊन पोचले. सायंकाळ ला बेशुद्ध करून जोरबंद करण्यात आले व त्याला सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये आणण्यात आले व त्यानंतर समोरील उपचाराकरिता चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
सदर वाघ हा नऊ महिन्याचा बछडा असून ती मादा वाघ असल्याचे कळले. तिच्या समोरच्या डाव्या पायाला दुखापत असल्याने चालू शकत नसल्याने अशक्त झाल्याची शक्यता आहे. ही जखम शिकारीचा प्रयत्न करताना किंवा जंगलात भ्रमंती करताना झाली असण्याची प्राथमिक शक्यता आहे.
या रेस्क्यु चे वेळी तळोधी बा. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री कैलास धोंडने, क्षेत्र सहाय्यक आर. गायकवाड, वनरक्षक एस.एस.गौरकर, श्रिरामे वनरक्षक, स्वाब नेचर केअर संस्था चे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!