संघर्ष जेव्हा आई-वडिलांच्या मिठीत संपतो.... ऐश्वर्या आल्यानंतर नागपुर विमानतळावरील दृश्य..
संघर्ष जेव्हा आई-वडिलांच्या मिठीत संपतो....
शंकरपुर.... जगदीश पेंदाम
रशिया युक्रेन देशाचे युद्ध असल्याने, रशिया व युक्रेन देशात शिक्षण घेण्यासाठी भारतातील अनेक ठिकाणचे विद्यार्थी अडकले होते चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील ऐश्वर्या खोब्रागडे हि सुद्धा या देशात अडकलेली होती मागील काही दिवसांपासून शंकरपूर येथील ऐश्वर्या खोब्रागडे तिचे आई-वडील ऐश्वर्याची आतुरतेने वाट पहात होते....
शंकरपूर येथील ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे ही विद्यार्थी 2017 पासून एमबीबीएस चे शिक्षण घेण्यासाठी युक्रेन मधील टरनोपिल शहरांमध्ये शिक्षण घेण्याकरीता गेलीले होती, युद्ध सुरू असताना हंगेरी मधील बुडापेस्ट राजधानीमध्ये ती सुखरूप असल्याची माहिती सुद्धा आई-वडिलांना ऐश्वर्याने फोन द्वारे दिली पण आईवडिलांना मात्र घरी चैन पडेनासे झाले होते.....
मिशन गंगा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या देशांमध्ये रस्ते,वेगवेगळ्या मार्गाने सरकारकडून आणली रशियान केलेले आक्रमण सतत युद्धाच्या सावटाखाली भीती मनात ठेवून आपण यात मारले जाऊ ही भीती मनात ठेवून पायदळ वीस ते बावीस किलोमीटर खोब्रागडे ही चालत आली, पूर्ण शरीर अस्वस्थ होऊन त्या ठिकाणापासून मोठमोठया अग्नि दिव्यातून शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी बाहेर पडत विमानाने दिल्ली येथे आणले व 220 विद्यार्थ्यांना भारतातील विमानामध्ये बसवून दिल्ली येथे रवाना करण्यात आले, गुरुवारला सकाळी 11 वाजता दिल्ली येथील विमानतळावर 220 विद्यार्थ्यांमध्ये ती सुद्धा होती, महाराष्ट्र सदन दिल्ली मध्ये आराम करण्याकरीता ठेवण्यात आले त्या ठिकाणी जेवण्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली..
दिल्ली या ठिकाणी प्रत्येक राज्याचे एक केंद्र असून त्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना संबंधित राज्य मध्ये जाण्याकरिता करीता एकफार्म अधिकाऱ्यांमार्फत भरून घेतले व नंतर त्या-त्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केली..
शनिवारी दिल्लीवरून दुपारी बारा वाजता नागपूर करिता बसुन दुपारी दोन वाजता नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा या विमानतळावर दाखल होताच आई, वडील,मुलगी आल्यानंतर त्यांच्यात गळाभेट मिठी मारून हा संपूर्ण अनुभवलेला संघर्ष एका झटक्यात गळून पडला.....
आपल्या मुलीला तीन वर्षानंतर पाहिल्यावर आई-वडिलांना युक्रेन मधील परिस्थिती मनात बघून अक्षरशः जीव भांड्यात पडल्या लगत नागपूर विमानतळावर खोब्रागडे कुटुंबाकडून पाहायला मिळालं आपली मुलगी सुखरूप आल्यानंतर आई वडील यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रू मधून दिसून आले...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!