आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी युक्रेन वरून मायदेशी परत आलेल्या विद्यार्थ्यांची घेतली प्रत्यक्ष भेट...

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी युक्रेन वरून मायदेशी परत आलेल्या विद्यार्थ्यांची घेतली प्रत्यक्ष भेट...


शंकरपुर...
येथून जवळच असलेल्या आंबोली चौरस्ता येथील हर्षल बळवंत ठवरे तर शंकरपूर च्या ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे या दोन विद्यार्थ्यांनी युक्रेन मध्ये एमबीबीएस शिक्षण घेत होत्या. परंतु युक्रेन आणि रुस यांच्यात युद्ध सुरू झाल्याने पालकवर्ग चिंतेत होते. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गंगा ऑपरेशन ,कुशल नितीतून भारतातील विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात यशस्वी ठरले असून त्यात चिमूर तालुक्यातील विद्यार्थी होते. त्यात नुकतेच हर्षल बळवंत ठवरे व ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे मायदेशी आपल्या घरी सुखरूप परतले तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी आपल्या पदाधिकाऱ्या सह  चौरस्ता आंबोली येथील बळवंत ठवरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. दरम्यान नागपूर वरून प्रफुल खोब्रागडे हे आपल्या मुलीला परत आणीत असताना चौरस्ता आंबोली येथे भेट झाली.
बळवंत ठवरे यांच्या निवासस्थानी हर्षल ठवरे व ऐश्वर्या खोब्रागडे या युक्रेन वरून मायदेशी परत आलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन विचारपूस केली...
यावेळी भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजूकर ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, माजी नगरसेवक सतीश जाधव भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले निलेश गभने राजू बानकर सुनील किटे  बळवंत ठवरे,प्रफुल खोब्रागडे  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!