जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

स्त्रीशक्ती व्हाट्सअप ग्रुप, लोकमत सखी मंच तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्था मुल तर्फे महिला दिनविविध कार्यक्रमाचे आयोजन.



प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर

8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव व्हावा म्हणून विविध क्षेत्रातील महिलांचा मुल गौरव भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमासह मॅराथॉन स्पर्धेचे आयोजनही केले आहे.

दिनांक 8 मार्चला पहाटे 5 वाजता महिला व युवतींनी मॅराथॉन पायी चालण्याची स्पर्धा असून क्रमानुसार 700₹, 500₹, 300₹ असे विशेष बक्षीस देण्यात येणार आहे व ही स्पर्धा गांधी चौक ते पंडित दीनदयाल उपाध्याय इकोपार्क पर्यंत आहे. त्यानंतर 9 मार्च 2022 ला कन्नमवार सभागृह हॉल येथे महिला सक्षमीकरण या अंतर्गत वाव देण्यासाठी दुपारी एक वाजता समुहनृत्य स्पर्धा व नाटिका स्पर्धा आयोजित केलेली आहे. तरी दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा मॅराथॉन साठी विद्या बोबाटे 8805114871, समूहनृत्यसाठी कल्पना मेश्राम 9588478212, नाटीकेसाठी कल्पना पोलोजवार 8412923800 तरी सर्व महिलांनी सदरील कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष, स्त्री शक्ती व्हाट्सअप ग्रुप , लोकमत सखी मंच, कलश संस्कार योजना, जिजाऊ ब्रिगेड ग्रुपच्या सर्व महिलांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!