कॉंग्रेस—भाजपात आपसी तडजोडीची चर्चेने कार्यकर्ते हैरान

कॉंग्रेस—भाजपात आपसी तडजोडीच्या चर्चेने कार्यकर्ते हैरान



मूल (वार्ताहर)

येत्या काही दिवसातच जिल्हा परिषदेची निवडणूक होवू घातली असून, मूल तालुक्यात एक जि.प.सदस्यांची वाढ होत असल्यांने यावेळची निवडणूक रंगतदार होणार आहे.  

सध्या राजोली—मारोडा, बेंबाळ—जुनासुर्ला आणि चिरोली—चिचाळा हे जि.प. गण असून, हे तिनही क्षेत्र भाजपाच्या ताब्यात आहेत.  सन 2011 ची लोकसंख्या गृहीत धरून नव्याने मतदार संघाचे फेररचनेत मूल तालुक्यात एका क्षेत्राची वाढ झाल्यांने आधीच्या क्षेत्रातील गावात बदल करण्यात आलेला आहे.  मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, नवे चार जि.प. क्षेत्र, मारोडा—राजोली, चिखली—चिचाळा, बेंबाळ—जुनासुर्ला, चिरोली—सुशी या नावांने ओळखल्या जाणार आहे.  पंचायत समितीचे गणही त्याचपध्दतीने पडणार आहे.  पूर्वीचे गावे देखिल नव्या क्षेत्रात समाविष्ट होत असल्यांने अनेक फेरबदल या क्षेत्रात झाले आहे.

एका राजकीय कार्यकर्त्यांनी आमचे प्रतिनिधीशी चर्चा करतांना, कॉंग्रेस—भाजपात आपसी समझोता झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.  दोन सदस्य कॉंग्रेसचे निवडूण येण्यास भाजपातर्फे प्रयत्न करण्यात येणार असून, भाजपाचे दोन सदस्यांची निवड होण्यासाठी कॉंग्रेस 'कमजोर' उमेदवार देणार आहे.  मूलच्या राजकारणात कॉंग्रेस—भाजपात एकाच गुरूचे चेले सध्या निर्णायक भूमीकेत आहे.  त्यामुळे ही सेटींग सहज होवू शकते असे मत आता व्यक्त होत आहे. असे झाले तर, मूल तालुक्यात कॉंग्रेस—भाजपात 'फिफ्टी—फिफ्टी'चा खेळ होवू शकतो.  अलिकडेच मूल तालुका भाजपाच्या अध्यक्षा, जि.प. अध्यक्षा संध्या गुरूनुले यांनी निधी वाटपात केलेला पुराव्यानिशी गोंधळ चव्हाट्यावर आला असतांना, त्यांच्या कार्यपध्दतीवर खुद्द भाजपातच अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.  मात्र संधी असूनही कॉंग्रेसच्या नेत्यांनी या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.  केंद्रातील मोदीच्या कार्यपध्दतीवर टिका करणारे मूलचे कॉंग्रेसनेते, स्थानिक भाजपा नेत्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करीत असल्यांचे चित्र आपसातील 'सेटिंग'चा भाग असल्यांचीही उघड चर्चा आहे.

मूलच्या राजकारणात विनोद अहिरकर—प्रकाश मारकरवारची एन्ट्री

मागील निवडणूकीतील पराभवानंतर अचानक जिल्हयांच्या राजकारणातून 'एक्झीट' झालेले विनोद अहिरकर, प्रकाश  मारकवार यांनी जिल्हा परिषदेची तयारी सुरू केली.  निवडणूकीच्या समोर नागपूरवरून येणे आणि निवडणूकीसाठी दंड थोपटणे ही परंपरा प्रकाश मारकवार यांनी कायम ठेवल्यांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  मागील​ निवडणूकीत पोंभूर्णा तालुक्यातून दारूण पराभवाचे अनुभवानंतर, त्यांनी यावेळी आपले सुशिक्षीत पुत्र अजिंक्यसाठी मेहनत घेत आहे तर पोंभूर्णा तालुक्यातूनच देवराव भोंगळे यांचेकडून पराभूत झालेले विनोद अहिरकर हे राजकीय अज्ञातवासात गेले होते मात्र अलिकडे त्यांचीही सक्रियता तालुक्यात वाढली आहे. या दोंघामुळे  डोकेदुखी भाजपा ऐवजी तालुक्यात कॉंग्रेस जिवंत ठेवणार्‍या रावत गटाला होणार आहे. अलिकडेच राजगड येथे प्रकाश मारकवार यांचे मार्गदर्शनात खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे उपस्थितीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता.  या मेळाव्यास खासदार महोदय येवू नये यासाठी मूल शहरातील कॉंग्रेस नेते कमालीचे प्रयत्न केले मात्र तरीही खासदार महोदयांनी मारकवार यांचे शब्दाला किमंत दिली.  मेळावाही दणक्यात झाला. माजी आमदार देवराव भांडेकर वगळता तालुक्यातील एकही कॉंग्रेस पदाधिकारी या मेळाव्यास हजेरी लावली नाही.  यावेळी खासदार धानोरकर यांनी, दिवसा कॉंग्रेस आणि रात्री भाजपाचे गुणगाण   करणार्‍या कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍याना   ताकीद दिली.  ही ताकीद नेमकी कुणाला दिली? यावर आता चर्चा होत आहे.  मूलच्या राजकारणात पालकमंत्री विजय वडेट्टीवार समर्थक एक गट सक्रिय आहे,  जिल्हयाचे राजकारणात 'वडेट्टिवार विरूध्द धानोरकर' यांचेत पक्षातंर्गत शितयुध्द असून, धानोरकर मूल तालुक्यात आपले समर्थक तयार करण्यांचा प्रयत्न करीत आहे, त्याचाच एक भाग म्हणूनही या मेळाव्याकडे पाहीले जात आहे  

1 टिप्पणी:

झिंदाबाद!