यादवराव पोशट्टीवार महाविद्यालयात सातदिवसीय व्यक्तीमत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन
तळोधी (बाळापुर) :
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, तळोधी (बाळापुर) द्वारा संचालित यादवराव पोशट्टीवार महाविद्यालय, तळोधी (बा.) येथे गोंडवांना विद्यापीठ पुरस्कृत व्यक्तीमत्व विकास योजना अंतर्गत तसेच नानासाहेब फाउंडेशन, तळोधी (बाळापुर) प्रायोजित सात दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाव्दारे करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष, मा. श्री. सचिनभाऊ पोशट्टीवार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या मूर्तीला हार अर्पण करून करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्ष स्थानी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.पी.अरूणप्रकाश आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट प्रशिक्षक श्री. कुमार झिलपेलवार उपस्थित होते. व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीताने करण्यात आली. विद्यार्थी विकास अधिकारी व समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा समन्वयक प्रा. संजय चव्हाण यांनी प्रास्ताविकेतून कार्यशाळेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच कार्यशाळेतील विविध सत्राविषयी माहीती देवुन व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची आहे असे प्रतिपादन प्रास्तावीकेतुन केले.
सात दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण भारतभर विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून त्यांच्या परिसरामध्ये ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलं त्यांच्या बद्दल माहिती सादर करण्याचा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. विलास वानखडे यांच्या मार्गदर्शनात बी.कॉम. भाग एक चा ताईल शेख या विद्यार्थ्यांने चिमूर क्रांतीमध्ये योगदान दिलेल्या बालाजी रायपूरकर आणि बाबुलाल या दोन क्रांतीकारांच्या 1947 च्या चले जाव आंदोलनातील केलेल्या संघर्षावीषयी माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सचिनभाऊ पोशट्टीवार यांनी केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.अरूणप्रकाश यांनी. तर संचालन प्रा.शशिकांत शेंडे व पाहुण्यांचे आभार प्रा. गणेश नवघडे यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष, मा. श्री. सचिनभाऊ पोशट्टीवार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या मूर्तीला हार अर्पण करून करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्ष स्थानी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.पी.अरूणप्रकाश आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट प्रशिक्षक श्री. कुमार झिलपेलवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे दुसरे सत्र हे "माझे जीवन - माझी निवड" या विषयावर घेण्यात आले. यात मार्गदर्शक श्री. कुमार झिलपेलवार यांनी त्यांच्या मार्गदर्शनात जीवनाचे निश्चित ध्येय असावे आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असावे, जीवनात यशस्वी व्हायच असेल तर स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा दुष्टीकोन महत्वाचा असतो, जसे आपण जीवनाकडे पाहतो तसे आपण घडत असतो, तसेच आपण विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करायला शिकलो पाहिजे. अश्या प्रकारची चीकीत्सकवृत्ती आपल्या मनाला संतुलीत व योग्य नीवड करण्यासाठी मदत करते. यश प्राप्त करायच असेल तर स्वतः मधल्या चांगल्या गोष्टीला ओळखता आले पाहीजे. आपल्यात कुठल्या चांगल्या गोष्टी आहे आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण आपल्या क्षेत्राची निवड करायला पाहिजे हे सांगताना विविध प्रसिद्ध व कलागुण संपन्न व्यक्तीमत्त्वांची पीपीटी च्या माध्यमातून माहिती दिली. विविध प्रेरक उदाहरण देवुन व खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थांना त्यांनी सत्रात सक्रीय सहभाग घ्यायला लावला. या कार्यशाळेच्या उदघाटनाला यशस्वी करण्यासाठी कार्यशाळेचे सहसंयोजक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. मोहन रतकंठीवार, तसेच विविघ समीतीच्या माध्यमातुन प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे सक्रीय सहभाग घेतला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!