वलनी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
तळोधी (बा.)
नागभीड तालुक्यातील वलनी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध शारीरिक स्पर्धा असणाऱ्या नोकऱ्या मध्ये स्पर्धकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वलनी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटक श्री खोजराम मरस्कोले जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष श्री अनिल बोरकर हे होते.
या समारंभा प्रसंगी स्पर्धकांना संबोधित करतांना 'विविध शारीरिक स्पर्धा असणाऱ्या नोकऱ्या मध्ये स्पर्धकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वलनी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात यायला हवे' असे श्री खोजराम मरसकोल्हे सदस्य जी प चंद्रपूर यांनी मत व्यक्त केले,
यावेळी 40 स्पर्धक मुलं-मुलींनी सहभाग घेतला. मुलांसाठी 5 कि.मी. तर मूलींसाठी 3 कि.मी. वलनी- नांदेळ रोड वर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. सोबतच गोळाफेक स्पर्धा सुध्दा आयोजित करण्यात आली. गोळा फेक प्रथम मुलींमध्ये पल्लवी शेंडे, द्वितीय प्रियांका मोहुरले, तृतीय अस्मिता नेवारे,मुलांमध्ये गोळा फेक प्रथम सुरेश मांढरे, द्वितीय आकाश सुद्रीकार,तृतीय प्रणय पर्वते तर मॅरॅथॉन मध्ये मुलांमध्ये प्रथम रोहित गुरणूले, द्वितीय पप्पू मोहूर्ले, तृतीय प्रणय पर्वते. तर
मॅरॅथॉन मुलींमध्ये प्रथम पल्लवी शेंडे, द्वितीय प्रियंका मोहुर्ले, तृतीय अस्मिता नेवारे यांनी बाजी मारली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल बोरकर सरपंच , प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश सुरपाम उप सरपंच, चिलबुले गटशिक्षणाधिकारी नागभीड, सौ सुनंदा मरसकोल्हे मुख्याध्यापिका जी. प. शाळा वलनी, संदीप मसराम, प्रशिक्षक संतोष हंसकर, पिंटू अहिरकर, डॉ जगदीश कामडी, सोनू कटारे,अमोल वाढई, दत्तू गोंगले, रविकांत मुळेवार, तुलसीदास कुलसंगे, राहुल नरुके, पूजा नरुके,तुकेश्वर लोन बले, उमेश बोरकर,सुजित इचकापे व गावकरी उपस्थित होते. शेवटी आयोजकांचे ,गावकऱ्यांचे आणि स्पर्धकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!