मूल पोलीस स्टेशन येथे महिला दिन उत्साहात, विविध कार्यक्रम संपन्न

मूल पोलीस स्टेशन येथे महिला दिन उत्साहात, विविध कार्यक्रम संपन्न

मूल (अमित राऊत)

आज महिला दिनानिमित्य पोलीस स्टेशन मुल येथे सायबर सुरक्षा सप्ताह तसेच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. पोलीस स्टेशन मुल अंतर्गत सन २०२० - २०२१ मध्ये हरविलेले २९ मोबाईल सायबर सेल, चंद्रपूर चे मदतीने ट्रेस करून शोध घेण्यात आले.
यातील मिसींग रिपोर्ट देणारे तक्रारदार यांना पोलीस स्टेशन ला बोलावुन त्यांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. सदर कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांनी कार्यक्रमातील उपस्थितांना सायबर क्राईम अव्हेरनेस व महिला सुरक्षितता बाबत मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक यादव साहेब पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी यांची सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. पोलीस स्टेशन मुल चे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत ठवरे, पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड, पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके, ना.पो.अ. विनोद वाघमारे व पोलीस स्टेशन चे डि.बी पथक यांनी सायबर सेल, चंद्रपुर चे सहाय्याने मिसींग मोबाईल शोधण्यात मोलाची कामगिरी केली.
तसेच पोलीस स्टेशन मुल येथे जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधुन कार्यरत सर्व महिला अधिकारी व अमंलदार यांचे पोलिस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!