पळसगांव (खुर्द) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
तळोधी बा.:
नागभीड तालुक्यातील पळसगाव (खुर्द) येथे आज शिव विचार प्रतिष्ठान युवा मंच व युवा सरपंच बालू भाऊ सिद्धमशेट्टीवार यांच्या संयुक्त विद्यमानाने. ग्रामीण रुग्णालय पळसगाव (खुर्द) येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी गावातील दहा युवकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी रक्तदान शिबिर करीता चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालय व जिल्हा ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथील रक्त पेटी चमू आलेली होती. यावेळेस डॉ. तुषार मंडल, वैद्यकीय अधिकारी तळोधी (बाळापुर), आशा वर्कर छबुताई मेश्राम, नीरज सिद्धमशेट्टीवार, मिलिंद मेश्राम, दुनेदार नर्स मॅडम, इत्यादी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!