वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

 तळोधी बा.:
   
      तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत आलेवाही बिटातील, वाढोणा येथील शेतकरी बैल मालक, उसटु दशरथ येसनसुरे, वाढोणा, यांचा बैल काल कळपात चारायला गेला असता देवारबोळी गट क्रमांक १२७२   या ठिकाणी वाघाने ठार मारले असल्याचे आज बैलाचा शोध घेतला असता निदर्शनास आले. त्या संदर्भाने तळोधी बा. वनपरिक्षेत्र येथे कळविण्यात आले असता आज सकाळी आलेवाही बिटाचे वनरक्षक एस. बी. पेंदाम यांनी मोक्का पंचनामा केला. व मोक्का ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले. यावेळेस मोक्यावर बैल मालक, गुराखी, शेतकरी, वनमजूर रामदीन, वाहन चालक दीपक बारसागडे, वनमजूर राहुल पिद्दुलवार, व 'स्वाब नेचर केअर संस्था' चे सदस्य उपस्थित होते. यांनी परिसरातील शेतकऱ्यांना परिसरात फिरून वाघाचे वास्तव असल्याने सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. अस्याप्रकारची सुचना परिसरात शेतात काम करीत असलेल्या शेतकरी व शेतमजूर यांना दिली. आज परिसरात गस्त सुरू ठेवलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!