मकरसंक्रांतीचे महत्व
मकरसंक्रांतीचे महत्व
सूर्याचे मकर राशीत संक्रमण म्हणजे मकरसंक्रांत होय. यावर्षी १४ जानेवारी ला मकरसंक्रांत आहे. यानिमित्ताने होणारे हळदीकुंकू व तीळगुळ वाटणे यामुळे सात्विकतेची देवाणघेवाण होते अन समाजात स्नेहभाव व्रुंधींगत होतो.
तीळगुळाचे महत्व ःतिळामध्ये सत्वलहरींचे ग्रहण व प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते.
तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते. म्हणून संक्रांतीच्या दिवशी उटणे लावणे,स्नान, होम,तर्पण भोजन आणि दान या क्रुती करतांना तीळ वापरतात.
वाण देणे म्हणजे कायःःःमकरसंक्राती ते रथसप्तमी
या पर्वकाळात केलेले दान विशेष फलद्रुप होते. या काळात सुवासिनी जे दान देतात त्याला ''वाण देणे '' असे म्हणतात. " वाण देणे" म्हणजे दुसर्या जीवातील देवत्वाला शरण जाणे होय.
पर्वकाळात दिलेल्या वाणांमुळे देवतेची क्रुपा होते. म्हणून वाण देताना सात्विक वाण द्यावे. सात्विक वाण दिल्याने ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते.
सात्विक वाण देणे, म्हणजे एकप्रकारे धर्मप्रसार असून त्यामुळे ईश्वरकृपाच होते. इतके आध्यात्मिक महत्त्व मकरसंक्रांती या सणाचे आहे.
शेवटी आपला मनुष्य जन्म हा ईश्वरप्राप्तीसाठीच झाला आहे.
म्हणूनच आपल्या प्राचीन संस्कृतीतील धर्मशास्त्रात अगदी छोट्या छोट्या कृतीतुन ईश्वरप्राप्ती कशी करता येईल याचे ज्ञान आपल्याला दिले आहे.
आध्यात्मिक प्रगती सोबतच प्रत्येक सणांच्या माध्यमातुन मनुष्याच्या आरोग्याचा पण विचार करुन प्रत्येक सणाचा पदार्थ पण ठरवून दिला आहे. त्या त्या सणाला जर आपण तो पदार्थ ग्रहण केला, तर आपल्या आरोग्यासाठी पण तो पदार्थ चांगला असतो. ज्या ऋतूत जो सण येतो त्या ऋतुत मानवी शरिराला आवश्यक असणारे पदार्थ आपल्या हिंदु संस्कृतीत घालुन दिले आहे. आता मकरसंक्रांतीचेच पहा, या सणाला थंडी असते, तर तीळगुळ सेवन केल्याने शरिरातील ऊष्णता वाढते व शरीरातील स्नायुंना पण बळ प्राप्त होते. अशा प्रत्येक सणाचे जर आपण निरिक्षण केले, तर आपल्याला लक्षात येईल की, आपली हिंदु संस्कृती किती महान आहे. आपल्या संस्कृतीत या सणांच्या माध्यमातून मानवाचे शारिरीक ,आध्यात्मिक व वैज्ञानिक प्रगती करवुन घेतली जाते. म्हणूनच आपल्या सणांकडे एक मौजमजा म्हणून न पाहता शास्त्र समजुन घेऊन साजरे केले असता त्यातुन जास्तीत जास्त आनंद आपल्याला मिळेल.
!!!तिळगुळ घ्या ,गोड गोड बोला !!!
सौ.भारती जीवन कोंतमवार, मुल महत्व

सौ.भारती जीवन कोंतमवार, मुल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!